जनसन्मान सभेला सोलापूर शहरातून राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते वाहनाच्या ताफ्यासह रवाना ….
राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्यास राहणार उपस्थित….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १४ जुलै – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्रि सर्व आमदार याच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्यात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त बसेस आणि चारचाकी वाहनांनी बारामतीकडे रवाना झाले. बारामती येथील मिशन मैदान टी सी कॉलेज शेजारी बारामती येथे हा जनसन्मान महामेळावा होणार असून या मेळाव्याला सोलापुरातून प्रमुख नेते मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात बारामतीला रवाना झाले. या मेळाव्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारिणी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, युवक, युवती, विद्यार्थ्यी, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी विभाग, वी.जे.एन.टी.विभाग, त्याच बरोबर सोशल मिडीया, सांस्कृतिक विभाग, वाहतूक विभाग, वैधकीय कक्ष, विधानसभा उत्तर विभाग, विधानसभा दक्षिण विभाग, विधानसभा मध्य विभाग,यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी यांचे नियोजन केले होते.
विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगले यश मिळवल्याबद्दल तसेच जन माणसात राष्ट्रवादीची प्रतिमा कायम असल्याचे सांगत राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे कार्यकर्त्यांची संवाद साधून आगामी निवडणुका संबंधी सूचना देणार आहेत.
– संतोष पवार , जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
यावेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, बिज्जु अण्णा प्रधाने अनिल उकरंडे,बाबाराजे भोसले,सुरेश तोडकरी,अँड.सलीम नदाफ, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेवक मंदाकिनी तोडकरी युवक शहराध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का,युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख,कार्याध्यक्ष संजय मोरे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ व्ही जी एन टी अध्यक्ष रुपेश भोसले, वाहतूक आघाडी सेल अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष,अनिल बनसोडे, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल,सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष आशुतोष नाटकर वक्ता सेल अध्यक्ष नागेश निंबाळकर सोशल मिडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,सुजित अवघडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते