सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर 
सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत, पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सर्वांनी मिळून एकजुटीने एक दिलाने काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी भावना व्यक्ती केली.
    विष्णू निकंबे यांनी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महापालिकेचे उपमहापौर पद भूषविले आहे. गतनिवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णू निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी विष्णू निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सदैव शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी वैचारिक भूमिकेवर आधारित विचारधारेतून संघटनात्मक व सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. पक्षाने कायम केवळ विकासाभिमुख समाजकारणाला अग्रक्रम दिला असून, ह्याच वाटेवर आपण वाटचाल करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.
     याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान , प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे नगरसेवक गणेश पुजारी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *