युवा नेत्याच्या स्वागतांने भारावले…. सारेच जण 

शरद पवार यांचे जंगी स्वागत…..युवा नेत्याच्या स्वागतांने भारावले…. सारेच जण

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ११ ऑगस्ट – भटक्या विमुक्त जाती महासंघाच्या मेळाव्यासाठी सोलापूर शहरात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

मोदी पोलीस चौकी इथ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरफराज शेख यांचे वतीने जोरदार पुष्पवृष्टी व हलग्यांच्या कडकडात सत्कार करण्यात आला..

यावेळी शरद पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी शरदचंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा  तसेच निवेदन स्वीकारल्या! युवा कार्यकर्त्याच्या जंगी स्वागतामुळे शरद पवार चांगलेच भारावून गेले. सरफराज यांच्याााशी हस्तांदोलन करत कौतुक केले…

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू कुरेशी,  बिस्मिल्लाह शिकलगार,निशांत साळवे, डॉ गोवर्धन संचु,रतिकांत कमलापुरे, श्रीकांत गायकवाड,इमाम सर लालखां, रॉक शेख, आकाश सागर,बाळासाहेब पाटील, शेरू कुरेशी, फयाज सय्यद, युणूस मुर्शद, दौला कुरेशी,परवेज शेख, नूर नदाफ,बिलाल शेख,इलाही शेख,बापू सलवादे, इम्रान मुलाणी, तुफेल कुरेशी, अकील नदाफ, करीम शेख, सैफली शेख, रियाज शेख, अरबाज बागवान, आफताब शेख आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *