नायब तहसीलदारसह महसूल सहाय्यक अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात : वीस हजाराची लाच घेताना पकडले रंगेहाथ

नायब तहसीलदारसह महसूल सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ : वाहन सोडवण्यासाठी मागितली वीस हजाराची लाच

सोलापूर व्हिजन

सोलापूर दी २८ जून – अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी वीस हजाराची लाच मागून तडजोडीने दहा हजार रुपये घेणाऱ्या नायब तहसीलदारसह महसूल सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन २०२० मध्ये वाळू वाहतुक करताना तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून पकडण्यात आले असून, सदरचे वाहन जप्त करुन तहसिलदार सांगोला यांनी तक्रारदार यांचे वाहनावर १,३०,६८४  रुपये शासकीय दंड आकारला होता. सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाव्दारे भरुन त्याची पावती तहसिल कार्यालय सांगोला येथे जमा केली.वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्याकरीता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवयक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडणेबाबतचा अर्ज सादर केला असून सदर अर्जावरुन तक्रारदार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देणेकरीता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेडा येधील प्रकाश सगर, नायब तहसलिदार, विवेक ढेरे, पद महसुल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरीता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचेकरीता म्हणून २०,००० रुपये लाचेची मागणी करुन तहजोडीअंति १०,००० रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली. त्यापैकी ५,००० रुपये लाच रक्कम  विवेक ढेरे यांनी स्वतः स्विकारले वरुन त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रंगेहाथ पकडण्यात येवून त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार  अतुल धाडणे,  सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव,  राहुल गायकवाड  नेम. ला.प्र.वि. सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *