सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड.प्रशांत कांबळे तर कार्याध्यक्षपदी ब्रह्मदेव गायकवाड.
नारी सन्मान पुरस्काराने महिलांचा करणार गौरव ! मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २२ सप्टेंबर – सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवानुभव मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडळाचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे , दिलीप कोल्हे , सुनील रसाळे, बसवराज येरटे, विजय पुकाळे, आदीसह विश्वस्त उपस्थित होते.सदरच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जगदीश मुनाळे होते.
प्रारंभी देवीमातेचे प्रतिमेचे पुजन करुन आरती करण्यात आली. तद्नंतर सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी मागील वर्षाचा अहवाल आणि जमाखर्च वाचन केले. या अहवलास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी विविध देवस्थान तसेच नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी उत्सव काळात येणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या मांडल्या.
दरम्यान समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपली यशकीर्ती सर्वत्र पसरवणाऱ्या अनेक महिलांचा नवरात्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे नाव नवरात्र नारी आदिशक्ती असे असणार आहे. अशी माहिती यावेळी मध्यवर्तीच्या बैठकीत देण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये महिला सुरक्षा जागृतीचे आवाहन करणार
मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून २३५ मंडळांवर अंकुश असणार आहे. मंडळांनी कोणत्या बाबतीत कार्य करावे, याचे मार्गदर्शन त्यांना येणाऱ्या अडीअडचणी आणि सर्व निर्णय सहमतीने घेण्यासाठी मध्यवर्ती मंडळ कार्य करणार आहे. कार्यक्रमांमध्ये महिला सुरक्षा जागृतीचे आवाहन करणार आणि युवकांना या कार्याचा सहभागी करून घेणार आहे.
– ॲड.प्रशांत कांबळे , नूतन उत्सव अध्यक्ष, मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळ सोलापूर.
महिलांना देणार नारी आदिशक्ती पुरस्कार
यंदाच्या वर्षी आम्ही नारी आदिशक्ती पुरस्काराचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणार आहे. पहिल्यांदाच भेटवस्तू, समानपत्र , सन्मानचिन्ह देऊन महिलांचा सन्मान करणार आहे. यासाठी व्यापक स्तरावर महिलांच्या कार्याची माहिती घेऊन निवडक महिलांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
– दत्तात्रय मेनकुदळे , सचिव मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळ सोलापूर.
सार्वजनिक मध्यवर्ती नवत्रोत्स मंडळ नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे.
अध्यक्ष – ॲड.प्रशांत कांबळे.
कार्याध्यक्ष – ब्रह्मदेव गायकवाड.
सचिव – दत्तात्रय मेनकुदळे.
उपाध्यक्ष – चक्रपाणी गज्जम , किसन गर्जे , रोहित बिद्री , निलेश शिंदे.
खजिनदार -शिवानंद सावळगी,
मिरवणूक प्रमुख – सिद्राम गुब्याडकर , आशिष उपाध्ये , मल्लिनाथ सोलापुरे , संदेश गव्हाणकर.
प्रसिध्दीप्रमुख – शिवानंद येरटे.
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ट्रस्टी आणि सल्लागार यांच्यावतीने सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.