नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बुरुड समाज परडी परसराम बनवण्यात व्यस्त …

आराधी महिलांकडून लहान मोठ्या आकाराच्या परडीची होते मागणी
सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर प्रतिनिधी
आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात बुरुड समाज परडी आणि परसराम बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र शहरातील शिवगंगा मंदिर बलिदान चौक येथे दिसून येत आहे. आराधी महिलांसाठी परडी आणि परसराम याचे अननसाधारण असे महत्त्व असते. नवरात्राचे सांगता याच परडी पूजनाने होत असते. अनेक देवीभक्त पुरणपोळीच्या नैवेद्याने परडी भरतात. परडी भरण्याचा कार्यक्रमांनतर नवरात्र उत्सवाची विधीवत सांगता होते.

अनेक देवीभक्त पुरणपोळीच्या नैवेद्याने परडी भरतात. परडी भरण्याचा कार्यक्रमांनतर नवरात्र उत्सवाची विधीवत सांगता होते. त्यामुळे परडी आणि परसराम यांचे नवरात्र काळात एक वेगळे महत्त्वाचे स्थान आहे. दरम्यान, इतरवेळी देखील आराधी महिला दर शुक्रवार आणि मंगळवार देवीभक्तांच्या घरोघरी जाऊन परडीमध्ये पीठ गोळा करतात. देवीच्या नावाने उदरनिर्वाह करतात. सध्या नवरात्रोत्सवाचा कार्यकाळ सुरू होत आहे. त्या अनुषंगाने देवी भक्त आपल्या घरातील अडगळीचे सामान बाहेर काढून स्वच्छता करण्यात व्यस्त आहे. तर कोणी आपल्या घराला रंगरंगोटी करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहे. वर्षातून एकदा नवरात्र महोत्सवामध्ये देवीभक्त आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता आणि रंगरंगोटी करतो. त्यानंतरच देवीची विधिवत घटस्थापना आपल्या घरातील देवघरात करतो. यासाठी अनेक देवी भक्त दरवर्षी नवरात्र महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

बुरुड समाज गेल्या अनेक वर्षांपासून परडी आणि परसराम बनवत आहेत. बांबूच्या कामठ्यापासून या लहान आणि मोठ्या आकारातील परडी तसेच परसराम बनवतात. यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. लहान आकाराचे परडी १०० रुपये तर मोठ्या घराचे परडी १५० ते २०० रुपयांना आहे. त्याच पद्धतीने परसराम याची किंमत ५१ रुपये याप्रमाणे आहे. नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी आराधी महिलांची परडी आणि परसरामसाठी मोठी मागणी असते.
– सुनील वडतीले, परडी कारागीर
सोलापूरची ग्रामदेवता श्रीरूपाभवानी देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. मंदिर स्वच्छता करण्यात येऊन रंगरंगोटी केली जाणार आहे. मंदिराच्या सभा मंडपात असणाऱ्या विविध मोठ्या परड्यांची देखील स्वच्छता केली जात आहे. अनेक देवी भक्त आपल्या घरातून आणलेले पीठ, नैवेद्य, दक्षिणा आणि शिधा याने परडी भरतात. आराधी महिलांच्या आशीर्वाद घेतात. अनेक आराधी महिला देवीमातेच्या परडीची याचा सांग पूजा आणि सेवा सालाबाद प्रमाणे करतात.