तो खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा…. एका निष्पाप जिवाचा बळी गेल्यानंतर महापालिका बोध घेणार का ?

नवीपेठेतील तो खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा…. एका निष्पाप जिवाचा बळी गेल्यानंतर महापालिका बोध घेणार का ?

हाच तो नवीपेठेतील खड्डा

स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी व्यक्त केला संताप 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १४ जुलै- सोलापूर स्मार्ट सिटी अनेक समस्या जीव घेण्या बनत चालले आहेत. रस्त्यावरील खड्डे असू देत किंवा उघडे ड्रेनेज चेंबर याकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी जुना पुना नाका या ठिकाणी ड्रेनेज चेंबर मध्ये पडून महिलेचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यानंतर आता नवीपेठ इथ खोदलेला खड्डा नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

गेल्या महिनाभरापासून हा खड्डा असाच सताड उघडा असून यावर कोणतेही प्रकारचे सुरक्षेचे साहित्य लावलेले नाही. पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी सदरचा खड्डा गेल्या महिनाभरापासून खोदलेला आहे. सदरचे पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम झाले असले तरीही खड्डा तसाच उघडा ठेवण्यात आला आहे. प्रमुख रस्त्यावर ओजोरा तसाच पडल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. रात्री अपरात्री वाहनधारक पादचारी या खड्ड्यात पडून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीच उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेला आपला जीव गमावा लागला आहे. त्या घटनेनंतर देखील महापालिका प्रशासन बोध घेणार का ? असा सवाल आता स्थानिक नागरिकांमधून  आणि वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.

रस्त्याच्या कडेला खड्डा … वाहतुकीला अडथळा 

                       पिण्याच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीसाठी सदरचा खड्डा खोदण्यात आला होता. याला एक महिन्याचा कालावधी लोटला तरीही खड्डा तसाच उघडा आहे. एकीकडे नवी पेठ ही प्रमुख बाजारपेठ असताना या ठिकाणी नागरिकांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी खड्डा असल्याने वाहतुकीला अडचण होत आहे तसेच एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका ठरत आहे. अगोदरच एक घटना घडलेली आहे अशातच दुसरी घटना घटनेची महापालिका प्रशासन वाट पाहते आहे का ?

राजू मगर , अध्यक्ष नवीपेठ रिक्षा चालक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *