गजबजलेल्या नवीपेठेत वाढले खड्ड्यांचे साम्राज्य…महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष .

शहरातील खड्डे ठरताहेत जीवघेणे ; गजबजलेल्या नवीपेठेत वाढले खड्ड्यांचे साम्राज्य

महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष 

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १५ जुलै – सोलापूर शहरातील नवीपेठकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरच खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परगावच्या आलेल्या प्रवाशांचे याच खड्ड्यातून आगमन होते. स्मार्ट सिटीच्या रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील याच रस्त्यावर सर्वत्र नजरेस खड्डे पडतात. यामुळे अपघात होण्याचा धोका बळावतो आहे.

     शहरातील प्रमुख रस्त्यांवर जर असे खड्डे पडले असतील तर इतर रस्त्यांची काय गत असा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका आणि संबंधित विभाग कामात हलगर्जीपणा करत आहे. यामुळे वाहनधारक, रिक्षाचालक , दुचाकीस्वार , पादचाऱ्यांना विनाकारण परवड सोसावी लागत आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्डा पडला असल्याने वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डा चुकवून जाताना अपघात होण्याचा प्रसंग ओढवत आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 

     

 रस्त्यावरील पडलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. सदरचे खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा अपघाताचा मोठा धोका निर्माण होत आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे 

– वाहनधारक 

खड्ड्यातून जाणाऱ्या वाहनधारकांना अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने पाठीमागून वाहन चालवणे अत्यंत जीकरीचे जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तरी याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

– स्थानिक नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *