आजपासून टोल दरात वाढ ! जडवाहनांसाठी विजापूर रोड झाला महाग…

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केली टोल दरवाढ ; जडवाहनांसाठी विजापूर रोड झाला महाग…

सहा नाक्यांवर वर्षात ३९० कोटींची वसुली तर सुमारे २१५ कोटी टोल सावळेश्वर व वरवडे या नाक्यांवर केला जातो वसूल

प्रतिनिधी  / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१ एप्रिल

राज्यात आजपासून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरात ५ रुपयांची वाढ होणार असून, चारचाकी वाहनाला कमीत कमी ६५ रुपये तर जास्तीत जास्त ८५ रुपये टोल आकारला आणार आहे. चारचाकी वाहनाला विजयपूर महामार्गावर सर्वाधिक म्हणजे ८५ रुपये टोल आकारणी होणार आहे. पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रक तसेच बसेसना २६० रुपये टोल लागणार आहे. तर, विजयपूर हायवेवर २८० रुपये टोल लागणार आहे.

     दरम्यान, राष्ट्रीय प्राधिकरणाने राजमार्ग १ एप्रिलपासून नवीन टोल दर जाहीर केले आहे. नवीन दरानुसार टोल आकारणी करावी, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. अक्कलकोट हायवेवर यापूर्वी ६० रुपये टोल लागायचा. आता मंगळवार,( दि.१) एप्रिलपासून ६५ रुपये टोल लागणार आहे. २४ तासांकरिता ११५ रुपये लागणार आहे. पुणे हायवेवर चारचाकी वाहनांना पूर्वी ७० रुपये होता. मंगळवारपासून यात ५ रुपयांची वाढ होणार आहे. तुळजापूर महामार्गावर चारचाकी वाहनांना यापूर्वी ७० रुपये टोल लागायचा. आता ७५ रुपये लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण सहा टोलनाके

सोलापूर जिल्ह्यातील ६ टोलनाक्यांवर वर्षाकाठी ३१० कोटी १२ लाखांची टोलवसुली केली जाते. रोज सरासरी दीड लाखाहून अधिक वाहने या टोलनाक्यांवरून धावतात. पुणे हायवेवरील सावळेश्वर तसेच वरवडे या दोन टोलनाक्यावर वर्षाकाठी २१५ कोटींची टोल आकारणी केली जाते. सर्वांत कमी टोल सोलापूर-सांगली महामार्गावरील इंचगाव टोलनाक्यावर वार्षिक ३० कोटी रुपये टोल जमा होतो. अक्कलकोट हायवेवरील वळसंग ३१.२ कोटी रुपये, सोलापूर सांगली महामार्गावरीन अनकढाळ वार्षिक ३७ कोटी ८ लाख रुपये टोल जमा होतो.

महामार्ग              धावणाऱ्या वाहनांची संख्या

पुणे                             ४६ हजार

हैदराबाद                       २१ हजार

अक्कलकोट.                 २२ हजार

सांगली                         १४ हजार ५००

विजयपूर                       २६ हजार

तुळजापूर                         २३ हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *