फस्टॅगद्वारेच टोल वसुली रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वच टोल नाक्यांवर आजपासून हायब्रीड मार्गिका बंद !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १ एप्रिल
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास (एमएसआरडीसी) यांच्या अखत्यारितील टोल फास्टंगद्वारे पथकर न भरणान्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू १ एप्रिलपासून होणार आहे. त्यानुसार टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टंगमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत
दरम्यान, टोल नाक्यांकर फास्टंगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जात असल्याने दोन मार्गिका हायब्रीड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड, आदींद्वारे टोल स्वीकारला जात होता. मात्र, आज, मंगळवारपासून या हायब्रीड मार्गिका बंद करून सर्व मार्गिका फास्टैग, मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमएसजारडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टंगमार्फतच टोल वसूल केला जाणार आहे.
फास्टॅग स्टीकर लावा
नव्या निर्णयामुळे फास्टॅग नमलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फास्टंग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.