मै यहा का भाई… असे म्हणत चाकूने केले वार… नई जिंदगी भागातील थरारक घटना

मै यहा का भाई… असे म्हणत चाकूने केले वार ; नई जिंदगी भागातील थरारक घटना

सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी 

सोलापूर, दि ३ जुलै 

नई जिंदगी परिसरात चाकूने भोसकल्याची जबरदस्त घटना घडली आहे. सालार कंपनीच्या युवकांच्या घोळक्याने सोहेल रमजान सय्यद, (वय-२६ वर्षे) रा- ३१० बेगम पेठ, खरादी गल्ली, उत्तर सोलापूर, सध्या शिवगंगा नगर भाग-१ नई जिंदगी सोलापूर याला चाकूने भोसकून आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.

         या घटनेमध्ये आरोपी फैसल सालार रा-मुल्लाबाब टेकडी सोलापूर, जाफर शेटे, रा-पेंटर चौक सोलापूर, टिपु सालार, रा-विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर, पापड्या रा- पत्ता माहित नाही, अक्रम पैलवान, रा-विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर आणि त्यांच्या सोबत असलेले ३ ते ४ इसम यांनी (दि.२ जुलै) रोजी ५.३० वा चे सुमारास मौलान आझाद चौक नई जिंदगी सोलापूर, येथे फिर्यादी सोहेल सय्यद याला अचानकपणे लाथाबुक्यांने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अरोपी सोबत असलेले  ईतर ३ ते ४ इसम यांनी देखील फिर्यादीस जबरदस्त मारहाण  केली.

    त्यानंतर आरोपी गँगमधील फैसल सालार याने चाकु घेवून ” मे इधर का भाई हु कोई आगे आया तो… उसे खल्लास कर दूंगा” असे म्हणून नई जिंदगी भागात दहशत निर्माण केली. त्यामुळे तेथील दुकानदार यांनी आपली दुकाने बंद करून घेतली. तसेच तेथे राहणारे रहिवासी यांनी आप-आपली घरे बंद करून घेतली. त्यांनतर आरोपी आपल्या हातातील चाकुने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने डावा हात त्यांच्या आडवा घातला. त्यामुळे फिर्यादीचे डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्या झटापटीत फिर्यादी खाली पडला. सोहेल निपचित पडल्याचे पाहिल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्या घटनेनंतर फिर्यादीची आई बिल्कीस सय्यद, फिर्यादीचा लहान भाऊ शोएब रमजान सय्यद तसेच फिर्यादीचा मित्र नोमोन जहागिरदार जागेवर दाखल झाल्यानंतर जखमी सोहेलला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या चाकू हल्ल्याची नोंद एम.आय. डी.सी. पोलिस ठाण्यात झाली असून आरोपींवर गु.र.नं व कलम ५५५/२०२५ भा. न्याय संहिता कलम १०९,१८९(१),१८९(२),१८९ (४),१९१(१), १९१ (२), १९१ (३), सह भा. हत्यार कायदा कलम ४/२५, फौजदार सुधारणा कायदा कलम ७ मपोका ३७ (१) (३),१३५ प्रमाणे काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चाकू हल्ल्याच्या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *