पिंगा ग… पोरी पिंगा.. श्रीलक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात नागपंचमी निमित्तानं झोका… महिलांनी घेतला आनंद

नागपंचमी सणाचा जुळे सोलापुरात उत्साह ;

श्रीलक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात नागपंचमी निमित्तानं उंचउंच माझा झोका…

सेल…परिपूर्ण दालन व्हि.आर.पवार एकवेळ अवश्य भेट द्या 

सोलापूर व्हिजन न्युज,

प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक २६ मधील उद्धव नगर भाग एक येथे श्रीलक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात नागपंचमी निमित्तानं झोका बांधून नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिलांचा महत्त्वकांक्षी व आनंदाचा क्षण म्हणजेच नागपंचमी सण यानिमित्ताने प्रत्येक घरात नागोबाची पूजा करून आदल्या दिवशी भावासाठी उपवास करीत असतात.

    प्रत्येक महिला नागपंचमीचा सण आल्यामुळे रात्रभर मेहंदी हाताला लावून घेत असतात तसेच नागपंचमी सणासाठी नागोबाचा आवडता पदार्थ, पुरणपोळी,करंजी, असे अनेक पदार्थ करून रातभर मोकळ्या जागेत पिंगा फुगडी खेळून फेर धरत असतात त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.

 

नागपंचमीचे अवचित साधुन जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक येथील प्रसिद्ध जागृत मंदिर म्हणून संबोधले जाणारे श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात झोका बांधून त्याचे उद्घाटन प्रभाग २६ च्या कर्तव्यदक्ष,जनतेच्या मनातील, लोकप्रिय नगरसेविका राजश्री चव्हाण आणि प्राप्ती आकाश अलकुंटे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आला. त्याप्रसंगी श्री लक्ष्मी समर्थ ग्रुपच्या सर्वेसर्वा ज्योती मनोजकुमार अलकुंटे, योग शिक्षिका स्वाती शिंदे, अर्चना अचलेर, अनिता माने, श्री लक्ष्मी समर्थ ग्रुप मधल्या सर्व सेवेकरी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *