पूर्व भागातील अनेक भागात उभारण्यात आला उंचच उंच झोका…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ११ ऑगस्ट – श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे ग्रामीण भागासह शहरात ही मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरा करण्यात येत असते नाग आणि जीवतीच्या प्रतिमेची लाह्या-दुधाच्या नैवेद्याने सुवासिनी महिला मोठ्या भक्ती भावात पूजा करतात. नागपंचमी सण हा महिलांचा उत्साहाचा क्षण असतो नागपंचमीला उंच झोका घेऊन मुली व गृहिणी सणाचा आनंद घेतात याचीच गरज ओळखून पद्मशाली समाजातील युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सोलापूर शहरातील आपल्या लाडक्या बहिणींचा आवडता उत्सव असणाऱ्या नागपंचमीनिमित्त पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री सिद्धनागनाथ देवस्थान, पद्मा नगर याल्लालिंग मठ, हनुमान मारुती मंदिर माधवनगर, फलमारी झोपडपट्टी, आणि लोधी गल्ली येथे उंच झोका बांधून माता बहिणींना आनंद लुटण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला.
नागपंचमी सणानिमित्त लाडक्या भावाचा हिंदुत्ववादी परंपरा जपण्याचा हा एक छोटासा उपक्रम म्हणून नागपंचमीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झोका बांधून माता बहिणींना मनसोक्त उंच झोक्याचा आनंद घेण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी सांगितले. पारंपारिक सण उत्सव हे पारंपारिक पद्धतीने साजरा व्हावे येणारी पिढ्यांना पारंपारिक सणाचे महत्त्व जतन करण्यासाठी दरवर्षी ही संस्था पुढाकार घेईल असेही यावेळी श्रीनिवास संगा म्हणाले. श्री प्रतिष्ठानच्या वतीनं उंच माझा झोका उपक्रमात मुली अबाल वृद्धांसह पुरुष मंडळींनी देखील या झोक्याचा मनसोक्त आनंद अनुभवाला.
दरम्यान या उपक्रमाचा शुभारंभ पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री सिद्ध नागनाथ देवस्थान येथे श्री नागनाथ मूर्तीची महाआरती करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संतोष चन्ना पंतलु, गजानन कलादगी, वैजनाथ उघडे, मधुकर सरगम, श्रीकांत गणाते, चंदू वंगारी, विठ्ठल द्यावरकोंडा यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य आदींचे उपस्थिती होती. सोलापूर शहरांमध्ये मोठ्या झाडांची संख्या कमी असल्याने कृत्रिम पद्धतीने उंच अशा झोक्याची बांधणी करून विशेषता पूर्व भागातील कष्टकरी विडी, यंत्रमाग कामगार महिलांसाठी ही विशेष सोय श्री प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आल्याने उपस्थित महिलांनी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा आणि श्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.