एन.जी.मिल परिसरात पोशम्मा उत्साहात साजरा…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३९ जुलै – एन.जी.मिल चाळीतील पद्मशाली समाजाकडून आषाढ महिन्यातील पोशम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पद्मशाली समाजातील महिलांनी कलश घेऊन एन.जी.मिल चाळ, रामलाल चौक , परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
आषाढ महिन्यात देवी देवतांना नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा कायम आहे. सोलापूर शहरात बेडर , लोधी , पद्मशाली , गवळी अशा विविध समाज बांधवांच्या वतीने आषाढ उत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील साजरा केला गेला. एन.जी.मिल परिसरात पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या समाजाकडून हा आषाढ उत्सव सणाप्रमाणे साजरा करण्यात आला.
यावेळी सुवासिनी महिलांनी आपल्या डोक्यावर जलकुंभ , कडुलिंब घेऊन पोतराजसह हलगीच्या पारंपरिक वाद्यवर कलश मिरवणूक काढली. त्यानंतर मिल परिसरात असणाऱ्या पोशम्मा देवीच्या मंदिरात जलकुंभात आणलेल्या पाणी देवीच्या पायांवर ओतण्यात आले. त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न करण्यात आले. यावेळी वेंकट वरकल, श्रीनिवास गुड्डू , रघु महाराज वरकल , रवी मेरगु, अविनाश निर्गु ,अनु शिरसागर, श्रीनिवास तुम्हा, आयुष चोरमुले, विनायक वरकल , रोहन भीमरती , भरत बुड्डू , करुणा वरकल, पद्मावती वरकल, पुजा पोतु, मीनु वड्डेपल्ली, अश्विनी वड्डेपल्ली , रसिका भिमर्थी , उमा धारा , स्वप्ना मेरगु , भाग्यश्री फलमारी , विजया बोड्डु , स्वाती दुधगुडी , बबिता दावत आदींसह एन.जी.मिल चाळीतील रहिवासियांनी या उत्सवात सहभाग घेतला.