ड्रेनेज चेंबरच्या सांडपाण्याने यशवंत सोसायटी , श्रीराम नगर मधील नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
महापालिका प्रशासनाची ड्रेनेज दुरुस्ती कामात होते दिरंगाई
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १६ जुलै – यशवंत सोसायटी श्रीराम नगर मधील नागरिकांचे ड्रेनेज चेंबरमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंध अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली अनेक कामे नागरिकांच्या आता पथ्यावर पडू लागले आहेत. शहरातील विविध कामे बोगस झालेले निदर्शनास आल्यानंतर शहराच्या हद्दवाढ भागामध्ये देखील हीच परिस्थिती दिसत आहे.
शहरातील कुमठा नाका परिसरातील यशवंत सोसायटी आणि श्रीराम नगर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून हीच परिस्थिती कायम आहे. महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागीय कार्यालय तसेच अधिकाऱ्यांना संपर्क करून देखील कोणीही दाद देत नसल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील प्रमुख ड्रेनेज लाईन चेंबर तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे रस्त्यावर सांडपाण्याचे तलाव साचत आहे. पावसाळ्यामध्ये ही अवस्था असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. महापालिका प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार दिरंगाईमुळे चव्हाट्यावर आला आहे. सोसायटीमधील वातावरण अस्वच्छ आणि दुर्गंधमय होत आहे. सदरच्या कामामध्ये होत असलेले दिरंगाई विविध संसर्गजन्य रोगाला कारणीभूत ठरत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
एक महिन्यापासून झोन अभियंता , संबंधित दास कंपनीचे विजापूरे, सुतार, जाबेर शेख तसेच मुख्यकार्यालयाचे पेंटर शेफाली दिलपाक यांना कळहूनही दररोज लोकं येत आहेत जेटिंग मशीन गाडी बंद पडले असं सांगत आहेत सोसायटीत सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
– स्थानिक नागरिक