ग्रामदैवता रुपाभवानी,इंद्रभवानी मंदिर,पार्क चौकातील शमी वृक्ष परिसराची आयुक्तांनी केली पाहणी… विविध सूचनांची अंमलबजावणीचे दिले आदेश

ग्रामदैवता रुपाभवानी,इंद्रभवानी मंदिर,पार्क चौकातील शमी वृक्ष परिसराची पाहणी…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापुर दि.२१ सप्टेंबर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदैवता श्री रुपाभवानी मंदिर,जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर व सीमोल्लंघन मिरवणुक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डाॅ.सचिन ओंबासे,अति,आयुक्त संदीप कारंजे,रुपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लिनाथ मसरे,सुनील रसाळे,विजय पुकाळे,सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे,उत्सव अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

उत्सव काळात रुपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे, पार्क चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे गाड्या विजयादशमीच्या दोन दिवसा अगोदरच बंद करावे,मिरवणुक मार्गावर दिवाबत्ती मंदिर परिसर स्वच्छता,मिरवणुक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली.

यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सुचनांचे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे संबधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *