पारधी समाज आझाद मैदानावर ; अत्याचार तसेच हक्काची घरे पडल्याच्या निषेधार्थ पुकारले बेमुदत आंदोलन

पारधी समाज आझाद मैदानावर ; 

अत्याचार तसेच हक्काची घरे पडल्याच्या निषेधार्थ पुकारले बेमुदत आंदोलन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २६ मार्च 

मौजे झापेवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड येथील गट नंबर ५१ मध्ये निवासी घरे बांधून राहत असलेले अनुसूचित जमाती पारधी आणि पारंपारिक वन निवासी यांची १३ घरे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जमीनदोस्त केल्याप्रकरणी तसेच काही ग्रामस्थांनी पारधी कुटुंबावर केलेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मागण्यासाठी मंगळवार दि.२५ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

   

     मौजे बावी तालुका शिरूर जिल्हा बीड येथील वंजारी समाजाच्या शेतकऱ्यांनी आदिवासी समाजाच्या तरुणीला आणि तिच्या भावाला दि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतातील पिकांचे नुकसान करत असलेल्या  डुकरांना पकडण्यासाठी बोलावून घेतले. त्या डुकरांना पकडण्यासाठी आदिवासी पारधी समाजाचे दीपक आणि चांदणी हे दोघे सायंकाळी सहा वाजता गेले, असता उपस्थित वंजारी समाजाच्या लोकांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. चांदणीच्या पोटात लाथा घातल्या आणि तिची छेड करायला सुरुवात केली. तेव्हा उपस्थित दीपक सोडवा सोडव करत असताना त्याच्या डोक्यात तलवार मारली आणि त्याला बेशुद्ध केले. या घटनेची तक्रार शालन हारकु भोसले यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिली. शालन हारकु  भोसले ही मुला मुलीच्या उपचारासाठी बीडच्या दवाखान्यात गेली. शालन हारकु भोसलेवर आणि पारधी समाजातील लोकांवर वंजारी समाजाच्या लोकांनी दबाव आणून हे प्रकरण आपसात मिटवून घेतले. त्यावर समक्ष म्हणून आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजाचे कार्यकर्ते सतीश भोसले यांची सही घेतली.

    

     वंजारी समाजाच्या लोकांनी या घटनेचा मनात राग धरून काही दिवसानंतर सतीश भोसले यांच्यासोबत कुरापत काढून भांडण काढले आणि शिरूर पोलीस स्टेशन मध्ये सतीश भोसले त्याचा भाऊ आणि त्याचे वडील यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. सतीश निराळे भोसले याला (खोक्या) या नावाने संबोधून खलनायक आणि क्रूर चेहरा उभा केला.  झापेवाडी ता. शिरुर जि. बीड येथील अनुसूचित जनजाती आदिवासी  पारधी आणि पारंपारिक वननिवासी यांचे १३ घरे दि. १३ मार्च रोजी वनीकरण विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली. वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने या १३ घरांची मोडतोड केल्यानंतर गावातील गावगुंडांनी रात्री घरांचे सामान, गृह उपयोगी वस्तू, कपडे जनावरांचा, चारा, कोंबड्या, बदके आणि सामानांची जाळपोळ केली. आणि १३ कुटुंबातील गोरगरीब आदिवासी पारधी भटके विमुक्त वडार आणि मातंग समाजाला रस्त्यावर आणले.

      त्यानंतर वरील आरोपींनी या घटनेचा मनात राग धरुन सतीष भोसले व त्याच्या वडीलांविरुध्द पोलीस स्टेशन शिरुर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर शालन हारकु भोसले यांच्यावर सतत दबाव आणल्यामुळे शालन हरकू भोसले हिने तिच्या मुलीवर आणि मुलावर झालेल्या घटनेची फिर्याद शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. ००६३ नुसार अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार तसेच भारतीय न्याय संहीता बी. एन. एस. २०२३ चे कलम १०९,७४,३५२,३५१ (२), ३५१(३), ३(५), आणि बालकांची लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ प्रमाणे दाखल केली. अनुसूचित जमाती पारधी, वडार आणि मातंग समाजाच्या घराचे नुकसान केल्याप्रकरणी आणि घरातील सर्व सामान जाळून टाकल्याबद्दल आणि आदिवासी पारधी समाजाचे तरुण दीपक आणि चांदणी हिच्यावर झालेल्या मारहाण आणि अत्याचार प्रकरणी हे लोक न्याय मागत आहेत मागील चार-पाच दिवसापासून सतीश भोसले यांची पत्नी आणि अत्याचारग्रस्त परिवातील सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या समोर समोर उपोषण करत आहेत परंतु आजही यांना न्याय मिळालेला नाही.

             या धरणे आंदोलनास आंदोलनास आदिवासी सेवक महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त कडूदास कांबळे, सुदर्शन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी पारधी विकास परिषद महाराष्ट्र राज्य, सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे, पीडित कुटुंबाचे सदस्य प्रामुख्याने संगीता साईनाथ भोसले, तेजू सतीश भोसले, शालनबाई हारकू भोसले, राधाबाई भाऊसाहेब भोसले, कल्पना विश्वास चव्हाण, शारदा शहानूर काळे, जयश्री धर्मेंद्र काळे, उर्मिला नवनाथ काळे, संगीता बाळू काळे, रुचिका नवनाथ काळे, चांदणी हारकू भोसले, आदीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *