मुस्लिम समाजाला शहर मध्य ला उमेदवारी द्या !
२० ऑक्टोंबर रोजी करणार फायनल नाव जाहीर…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १८ ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान त्याच अनुषंगाने शहर मध्य विधानसभा जागेवरून मुस्लिम समाजाकडून सातत्याने काँग्रेस पक्षाकडून अथवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मिळावी. यासाठी सर्व नेत्यांकडून मागणी केली जात आहे. निवडणुका घोषित झाल्यापासून मुस्लिम समाजाकडून आता उमेदवार मिळावा ही मागणी जोर धरू लागली आहे.असे असताना आता आज शहरातील मुस्लिम समाजातील नेते एकत्र येत आज पत्रकार परिषद घेत, मुस्लिम समाजाला उमेदवारी मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेस तौफिक शेख,आरिफ शेख,रियाज हुंडेकरी,शौकत पठाण,कोमारोह सय्यद व नुरोद्दीन मुल्ला उपस्थित होते.या पत्रकार परिषदेस माजी महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, तौफिक शेख, शौकत पठाण, नैरुद्दिन मुल्ला, कोमारो सय्यद, शकील मौलवी, शिवा बाटलीवाला, मैनोद्दिन शेख उपस्थित होते.
२० ऑक्टोंबर रोजी करणार फायनल नाव करणार जाहीर.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी करत दि.२० ऑक्टोंबर रोजी सर्व पक्षीय नेत्यांचा मेळावा आयोजित करून अंतिम नाव जाहीर करणार आहे.
– आरीफ शेख, माजी महापौर.