31 ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त सेटलमेंट मरीई मंदिर पिवळा मंदिर पामलौर गल्ली येथे मोठ्या प्रमाणावर समाज बाधवासमवेत झेंडा वंदन करुन आनंदोत्सव साजरा…
सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी
सोलापूर, – भारत देश १९४७ साली देश स्वतंत्र झाला परंतु भटक्या विमुक्तांना ३१ ऑगस्ट १९५२ रोजी १८७१ चा गुन्हेगारी कायदा रद्द करून मुक्त करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस रोजी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून आज ३१ ऑगस्ट रोजी सेटलमेंट भागात आनंदउत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.
दरम्यान नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी झेंडावंदन झाले संपुर्ण सेटलमेंट परिसरात तीस बाय पंचेचाळीस फुटाचा भव्य तिरंगा झेंडा फडकावून आनंदउत्सव साजरा करत रॅलीद्वरे प्रदर्शित करण्यात आले
सकाळी १० वाजता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ६,मरीई मंदिर सोलापूर येथे ह भ प सद्गुरु शिवलाल महास्वामी महाराज, ह भ प अच्युत मोफरे महाराज, व ह भ प नागा गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आले. याकार्यक्रमा प्रसंगी मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव , पामलौर समाज चे सरपंच नागनाथ मनोहर गायकवाड समाजसेवक वसंत जाधव,उद्योगपती काशिनाथ जाधव ,(मुंबई) मोहन डांगरे, शंकर शिवाजी जाधव , मोहम्मद इंडीकर, पवन गायकवाड,अरुणा वर्मा, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, दत्तात्रेय जाधव, दशरथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमास सहभाग घेऊन शोभा वाढविण्यात आले