मुक्तिदिनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुक्तिदिनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर, दि. ३ सप्टेंबर – ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून, त्यांना बंदिस्त केलेल्या कुंपणाच्या तारा सोलापुरात स्वतःच्या हाताने तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले.

              दरम्यान त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

               यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहरध्यक्ष युवराज जाधव, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मार्गदशक संजय गायकवाड, VJNT प्र संघटक मल्लेश सूर्यवंशी, VJNT महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडियासेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, दीपक नंदुरकर, भीमराव बंडगर, मोहसीन फुलारी, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *