स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) अव्वलस्थानी राहील-प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) अव्वलस्थानी राहील-प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सत्कार

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१४ जुलै 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वल स्थानी राहील, यासाठी प्रदेश कार्यकारिणी आणि सदस्यांनी याची नोंद घ्यावी. अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना दिली.

           दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड येथील गीता बाग सुतारवाडी येथे त्यांचा निवासस्थानी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक लोककल्याणार्थ निर्णय घेण्यात आले.   यावेळी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आणि हजारो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *