विठ्ठल रुक्मिणीच्या दारी,नाचु लागले वारकरी,
झिम्मा, फुगड्या फेर धरी..आनंदाने बहरली श्रीहरीची नगरी..!!
सोलापूर व्हिजन
पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदेंनी वेधले लक्ष : इसबावीत महिला वारकऱ्यासोबत धरला फुगडीचा फेर
पंढरपूरच्या वेशीवर असलेले इसबावी येथे आषाढी वारी सोहळ्याचं सगळ्यात शेवटचं रिंगण सोहळ्यात घेतला सहभाग…
सोलापूर दि १७ जुलै – खासदार प्रणिती शिंदे सहभागी होऊन दिंडीतील वारकर्यांच्या सोबत ठेका…टाळ-मृदंगांच्या गजरात फुगड्या अन् हरिनामाचा गजर केला. रिंगण सोहळ्यानंतर विसावा मंदिर येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, संत मुक्ताबाई व अन्य सर्व पालख्या एकत्रितपणे पंढरपूरकडे विठू माऊलीच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.
दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या वतीने आषाढी वारी निमित्त येणाऱ्या सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पालखी प्रमुखांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी वारकरी आणि भाविकांमध्ये प्रणिती शिंदेंची क्रेझ दिसून आली. मोठ्या भक्तिमय वातावरणात हा सुरेख नयनरम्य सोहळा संपन्न झाला.