खा. प्रणिती शिंदेंच्या निवासस्थानी प्राण प्रतिष्ठापना केलेल्या श्रींचे बंदपट्टे मित्रपरिवाराने घेतले दर्शन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. ११ सप्टेंबर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील जाई-जुई फार्म हाऊस येथे खा.प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी श्रींचे दर्शन सी.ए. सुशील बंदपट्धे मित्र
परिवाराने घेतले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे टाकळी येथे जाई-जुई हे फार्महाऊस असून येथे दरवर्षी श्रींची मनोभावे शिंदे कुटुंबियांकडून मनोभावे प्राण प्रतिष्ठापना
केली जाते. राजकीय घडामोडीत कितीही व्यस्त असले तरी शिंदे कुंटुंबियांकडून नित्यनियमाने श्रींची पूजाअर्चा केली जाते. यंदाही त्यांच्या निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनधी सी.ए सुशील बंदपट्टे मित्रपरिवाराने टाकळी येथे जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी श्रींचे चरणी प्रार्थना करून सर्वत्र सुख समृद्धी शांती लाभो हीच मागणी केली. यावेळी सीए सुशील बंदपट्टे, राजा कलकेरी, महेश अलकुंटे, अशोक यमपुरे,दत्तात्रय अलकुंटे, संतोष इरकाल, भीमाशंकर बंदपटे, शाम मुडे, श्रीनिवास यमपुरे संदीप म्हेत्रे आणि चंद्रनील मित्र परिवार उपस्थित होते.