सरपंच संतोष देशमुखांची हत्या क्रूर – खा.प्रणिती शिंदे
खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची केली मागणी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ मार्च
महाराष्ट्रात मस्साजोग आणि स्वारगेट सारखे अनेक घटना घडले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सत्ताधारी सत्तेसाठी हपापलेले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा यापूर्वीच घेणे नैतिक जबाबदारी होती. परंतु तसे घडले नाही. पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर राजीनामा घेतला जातो. ही केवळ हास्यास्पद गोष्ट आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना या खून प्रकरणात मुख्य आरोपी करण्याची आमची मागणी आहे. असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहेत.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी या घटनेवरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कोणाच्या सांगण्यावरून हे सगळे प्रकरण घडले आहे. हे सगळे जगाला माहिती आहे. असे असून देखील राजीनामा घेतला जात नाही. या घटनेत सरकारची कोणतीच नैतिक जबाबदारी राहिली नाही. केवळ राजीनामा घेण्याचे नाटक केले. सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रिपद दिले जाते. या खून प्रकरणातून सरकारचा आणि मुंडे यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. स्वारगेट आणि मस्साजोग येथील घटनेवरून समजून येते, की राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. अशी खंत देखील खा. शिंदे यांनी व्यक्त केली.