लांडगेंच्या “त्या” वक्तव्याचा खा. प्रणिती शिंदे घेणार का समाचार…? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लागले लक्ष…

खा. प्रणिती शिंदे सोलापुरात दाखल… लांडगेंच्या त्या वक्तव्याचा घेणार का समाचार ?  

लांडगे अत्यंत किरकोळ, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही : चेतन नरोटे

त्या वक्तव्यावरून पक्षाची संस्कृती उघड – विनोद भोसले

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ जून

खा.प्रणिती शिंदे या सोलापुरात दाखल झाल्या आसून त्यांच्या अनुपस्थित त्यांच्यावर वंचितच्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा त्या चांगलाच समाचार घेतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांनी यापूर्वीच लांडगे यांची राजकीय उंची फुटपट्टीत मोजली असून, ताई आता कशा पद्धतीने वंचितांचा खरपूस समाचार घेतली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

      दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल लांडगे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. यावेळी लांडगे यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांच्या “त्या” वक्तव्याचे पडसाद शहरात उमटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लांडगे यांच्या वादग्रस्त विधानामुळे सोलापूर शहराची शांतता भंग होणार का अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे. मात्र या वादावर चेतन नरोटे यांनी समर्पक प्रतिक्रिया देताना लांडगे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. लांडगे अत्यंत किरकोळ.. त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे आम्हाला महत्त्वाचे वाटत नाही असे म्हणून लांडगे यांच्या बुद्धीची कीव केली आहे.

     दरम्यान, या वादावर शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांची राजकारणामधील कर्तत्व प्रचंड मोठे आहे. त्यांचे राष्ट्रीय स्तरावर काम आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची अमोल लांडगे यांची लायकी नाही, त्यांच्या गावात त्यांना कोणी विचारात नाही, सोलापुरात येऊन भडकावू भाषणे करणे म्हणजे मर्दूमकी नव्हे, असा जोरदार प्रतिहल्ला काँग्रसेचे शहराध्यक्ष चेत नराटे यांनी लांडगे यांच्यावर चढवला. दलित समाज हा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी आहे, या समाजा मोठ्या प्रमाणावर मतं शिंदेंना मिळाली आहे, त्यामुळे वंचितवाल्यांच्या पोटात पोटशुळ उठला आहे, लांडगे हे किरकोळ आहेत, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही, असेही नरोटे शेवटी म्हणाले.

त्या वक्तव्यावरून त्यांची व त्यांच्या पक्षाची संस्कृती कळून येते.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राजकीय वर्तुळात आपली छबी उंचावण्यासाठी ते चुकीचे विधान केले. यामुळे त्यांची व त्यांच्या पक्षाची संस्कृती कळून चुकली आहे. हे वादग्रस्त वक्तव्य म्हणजे सूर्यासमोर थुंकणे असे होते, शेवटी ते त्यांच्याच चेहऱ्यावर पडले आहेत. शिंदे कुटुंबियांनी खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभाव जोपासला आहे. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एका महिला खासदारांबाबत वक्तव्य करणे अंत्यत्य वाईट वृत्ती आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार जनमानसात निर्माण करणे गरजेचे असताना समविचारी विचारांचा त्याग केलेला या वक्तव्यावरून दिसत आहे.

– विनोद भोसले, माजी नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *