खा.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

खा.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम : डी ब्लॉकने वितरित केले उबदार शाल..

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ डिसेंबर 

सोलापूर शहरात खा.प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, प्रभाग क्रमांक २२ येथे प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे ओचित्त साधून दीक्षित हॉस्पिटल समोर लिमेवाडी येथे महिलांना उबदार शाल वाटप करण्यात आले.

    सध्या सोलापूर शहरामध्ये सध्या थंडी मोठ्या प्रमाणात असून ज्येष्ठ महिलांना या थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांच्यावतीने उबदार शाल वाटप करण्यात आले. यावेळी माजी महिला अध्यक्ष अरुणा वर्मा, ॲड करीमुनिसा बागवान, सुभाष वाघमारे शहर अध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस सोलापूर, वार्ड अध्यक्ष नागनाथ सावने, मुमताज शेख, गौरी हादीमणी, विजया लक्ष्मी झाकणे, सुनिता शिगारे आदींसह भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *