खा.प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ; विजापूर रोडवरील प्रभाग क्रमांक २२ मध्ये समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ डिसेंबर
देशाच्या नेत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि सोलापूर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 22 मधील विविध नगरांमध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या डी ब्लॉक च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आरोग्य शिबिर, गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. सुहासिनी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी सोनिया नगर भीम ज्योत तरुण मंडळ येथे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आबालवृद्ध नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. याकार्यक्रमास डी ब्लॉकचे अध्यक्ष देवीदास गायकवाड तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीपान सोनवणे युवा नेते कुणाल गायकवाड अनिल मस्के सुभाष वाघमारे नागनाथ सावने संजय सोनवणे रुबीन डेव्हिड मुमताज शेख विजय झाकणे संगीता शिंगारे गौरी हादीमणी द्रौपदी शिवशरण हो मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
