हे उपकार आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही…

दक्षिण सोलापूर तालक्यातील जनतेने साथ देऊन केले विजयी : नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आभार……

सोलापूर व्हिजन :- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील जामगोंडी मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.दक्षिण सोलापूर तालक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वला शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सर्वांचे आभार व्यक्त करताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे प्रत्येक गावात मताचे लीड देऊन माझा विजय सुकर केला, या आधीही शिंदे साहेबांना साथ दिली हे उपकार  फेडू शकणार नाही, त्याच बरोबर स्वर्गीय आनंदराव देवकते यांचेही उपकार आहेत. ते उपकार फेडण्यासाठी दक्षिण सोलापूरचा विकास,  शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला दर, वीज पुरवठा, कांदा निर्यात, GST चा त्रास, बेरोजगारांच्या हाताला काम, आरक्षणाचा प्रश्न, निराधारांना पेन्शन, रस्ते आधी विकासकामे करायचे आहेत तरच त्यातून उतराई होईल. तुमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आतुर आहे. काम केल्यामुळे शहर मध्य मधील जनतेने तीन वेळा आमदार केले. लोकांचे काम करण्यात समाधान आहे ते कोणत्याही मंत्रपदात नाही. या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे घटक पक्ष, सिध्देश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी  यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी सहकार्य केले त्यांचेही आभार, या निवडणुकीत आपल्याकडून राहुल गांधी प्रचारासाठी आले होते.त्यांचेही आभार यावेळी शिंदे यांनी मानले.

फडणवीसांच्या इशाऱ्यावरून दंगल घडविण्याचा प्रयत्न….

सोलापूर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून जातीधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवायचा प्रयत्न केला. भाजप उमेदवार सुद्धा भांडणे लावायच्या प्रयत्नात होते. पैसे वाटले. मोदी, योगी, टी. राजासिंह, अनेक मंत्री यासारखे अनेक नेते प्रचाराला आले. पण जनतेने जातीधर्माचे राजकारण करणाऱ्या, संविधानाला विरोध भाजपला चपराक दिला. हा विजय भाजपच्या राक्षसी मानसिकतेच्या विरोधातील विजय आहे. लोकांनी काम करणाऱ्यांना विजयी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण मधून आमदार महाविकास आघाडीचा झाला पाहिजे यासाठी तयारीला लागा.असेही त्यांनी यावेळी सांगितले.शिंदे साहेबांनी अनेकांना मोठ्ठे केले. आजपर्यंत जिल्ह्याचे नेतृत्व केले यापुढे तसेच राहील. कार्यकर्त्यांनी आपली बहीण खासदार झाली आहे म्हणून गर्वाने सांगा लोकांचे कामे आणा मला भेटायला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही डायरेक्ट येऊन भेटा असे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *