शहरातील मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या ताब्यात

शहरातील मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या ताब्यात….

सोलापूर दि २९ जून – शहर गुन्हे शाखेकडील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाो मोरे त्यांचे तपास पथकाने, त्यांना मिळालेली बातमी व तांत्रिक विश्लेषणाचे अनुशंगाने माहे जुन २०२४ मध्ये, खालील नमुद वेगवेगळया ०५ आरोपींकडून, सोलापुर शहरातील विविध पोलीस ठाणेस दाखल असलेले, एकुण ०५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

                          दरम्यान यामध्ये १) आरोपी नामे रावजी विरप्पा माने, वय ४६ वर्षे, रा. रेलगंठी कॉम्प्लेक्स, अशोक चौक, सोलापुर यांच्या कडुन दिनांक १२/०६/२०२४ रोजी, सदर बझार पोलीस ठाणे  ३७९ च्या  गुन्हयातील, एम.एच.१३ सी.डी. ८९३४ या क्रमांकाची २५,०००/- रुपये किंमतीची हिरो होंडा शाईन ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. तर २) आरोपी नामे सुर्यकांत अप्पाराव हेलगर वय ३९ वर्षे, रा. २१२, भवानी पेठ, सोलापुर याचेकडुन, दिनांक २४/०६/२०२४ रोजी, विजापुर नाका पोलीस ठाणे गुरनं. २१८/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील, एम.एच.१३ बी.जे. ०१८५ या क्रमांकाची २०,०००/- रुपये किंमतीची हिरो एच.एफ. डिलक्स ही मोटारसायकल जप्त  करण्यात आली आहे. तसेच तिसऱ्या गुन्ह्यातील आरोपी  मलीक हुसेन पटेल, वय २७ वर्षे, रा. गरीबी हटाव झोपडपटटी नं. १, विजापुर नाका, सोलापुर याचेकडुन, दिनांक २५/जुलै रोजी, सदर बझार पोलीस ठाणे  ३७९ या गुन्हयातील एम.एच.१३ सी.पी. ०८३० या क्रमांकाची ३५,०००/- रुपये किंमतीची, बजाज सीटी १०० ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

                             ४) आरोपी नामे सुनील भिम शेरखाने, वय २६ वर्षे, रा. प्लॉट नं. १२३, शिवगंगा नगर, नई जिंदगी, सोलापुर याचेकडुन, दिनांक २७/०६/२०२४ रोजी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं.- ३४९/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील के.ए. ०१ जे.एक्स. ४७५२ या क्रमांकाची ४०,०००/- रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.५) आरोपी नामे युसुफ बाशुमियाँ शेख, वय ५३ वर्षे, रा. घर नं. ६४६, उत्तर सदर बझार, सोलापुर याचेकडुन, दिनांक २८/०६/२०२४ रोजी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं. १३०/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील एम. एच. १३ डी.व्ही. १३७८ या क्रमांकाची ४०,०००/- रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.अशाप्रकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे व त्यांचे तपास पथकाने वरीलप्रमाणे, पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीतील मोटारसायकल चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणुन, एकुण १,६०,०००/- किंमतीच्या ०५ मोटारसायकल हस्तगत केलेल्या आहेत.

                      सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार , तसेच पोलीस उपायुक्त होण्यासाठीची डॉक्टर दिपाली काळे, तसेच  सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रांजली सोनवणे तसेच  गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक  सुनील दोरगे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे, पोलीस पोलीस अंमलदार- संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार, दिलीप किर्दक, पोह- पाटील, पोशि- राठोड, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

यांनी कारवाई केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *