
मोहसिन शेख ( नेता ) यांचा शेकडो कार्यकर्त्यांसहित शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ डिसेंबर
सोलापूर शहरातील भाजपचे पदाधिकारी मोहसीन शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे हे सोलापूर शहर दौऱ्यावर आले असता, संजय मोरे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचे उपरणे घालून पक्षात पक्ष प्रवेश करण्यात आला. प्रभाग क्रमांक २० मध्ये त्यांनी गत २०१७ महापालिका निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली होती.

यावेळी शिवसेनेचे नेते माजी गृहराज्यमंत्री तथा नांदेडचे जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे व जिल्हाप्रमुख अमर पाटील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसेच शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महाराष्ट्र राज्याचे प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे, नगरसेवक मनोज शेजवाल, नगरसेवक उमेश गायकवाड, शिवसेना चे नेते श्रीनिवास संगा,उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सद्गुबरु, नवनाथ चव्हाण, सोलापूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख अनिता माळगे, सोलापूर जिल्हा महिला प्रमुख रवीना राठोड, महाराष्ट्र युवती सेनाचे प्रियंका परांडे, अल्पसंख्यांक जिल्हा संपर्कप्रमुख रजाक मालक मुजावर, जिल्हा प्रमुख एजाज सर शेख, शहर प्रमुख गफूर दादा शेख, उपशहर प्रमुख मोईन भाई शेख, ज्येष्ठ नेते सलाउद्दीन शेख, रशीद कुरेशी, सलमान कम्प्ली,जुबेर बागवान, फिरोज जमादार , तन्वीर मकानदार, नौमान अंसारी, रहीम बागवान, समीर शेख,रहीम शेख , नईम शेख, गफार शेख शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.