जिंकण्यासाठी लढणार बदल घडवणार ! मनसे इंजिन धावणार ?
सोलापूर शहर मध्ये साठी मनसेकडून नागेश पासकंटी यांना उमेदवारी जाहीर..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६ ऑक्टोंबर – सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महादेव कोगणूरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून अखेर नागेश पासकंटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकतेच भाजपमधून मनसेमध्ये प्रवेश केलेल्या पासकंटी यांना राज ठाकरे यांनी उमेदवारी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे बोलले जात आहे.
दरम्यान भाजपमध्ये कामगार आघाडीवर कम केलेले नागेश पासकंठी यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केले. परंतु आपल्याच पक्षातील काही नेत्यांनी बेछूट आरोप केल्याने नाराज होऊन पासकंठी यांनी भाजपला रामराम ठोकत राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज ठाकरे यांनी बळ दिले असून, आता लढायचे आणि जिंकायचे असा आशावाद राज ठाकरे यांनी दिला असल्याचे मनसे उमेदवार नागेश पासकंटी यांनी सांगितले.
सोलापूर शहर जिल्ह्यात मनसे सर्व ताकदीनीशी लढणार
सोलापूर जिल्ह्यातील पाच जागांवर मनसे निवडणूक लढवणार आहे. यापूर्वीच शहर उत्तर आणि शहर दक्षिण या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. आता शहर मध्य मतदारसंघांमध्ये उमेदवारी देऊन शहरातील तीन तसेच जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा व अक्कलकोट या मतदारसंघात उमेदवार देऊन पाच जागा लढवणार आणि जिंकणार आहे.
विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष मनसे.