महापालिकेची आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर : महापालिकेचे सोनोग्राफी केंद्र राम भरोसे……
– अहिल्याबाई होळकर प्रसितीगृहातील सोनोग्राफी विभागाचे वैद्यकीय अधिकारी गायब
– गर्भवती महिलांना सहन करावा लागला मानसिक व शारिरीक त्रास
– महापालिका आरोग्य अधिकारी डॉ राखी माने ॲक्शन मोडवर
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जून – सोलापूर शहरातील महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्रसितीगृह अर्थात डफरीन हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी करणारे तज्ञ अधिकारी जागेवर नसल्याने आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा पार कोलमडलेली दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांनी प्रशासनाला सूचना करून देखील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत. यंत्रणेत काही केल्या सुधारणा होत नाही. असे निदर्शनास येत आहे. सोनोग्राफी केंद्राची वेळ नऊ वाजताची असताना संबंधित अधिकारीच जागेवर नसल्याने दवाखाण्यात आलेल्या गर्भवती महिला रुग्णांना ताटकळत बसावे लागले.
दरम्यान महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या महिला रुग्णांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी डफरीन हॉस्पिटलमध्ये सकाळपासून गर्भवती महिलांनी सोनोग्राफी करण्यासाठी गर्दी केली होती, सकाळ सात वाजल्यापासून या महिलांना डॉक्टरांची वाट पाहत तीन तास ताटकळत बसावे लागते, गरोदर महिलांना सोनोग्राफी करतेवेळी उपाशीपोटी यावे लागते, परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच हजर नसल्याने अनेक महिलांनी संताप व्यक्त केला, डॉक्टर ह्या नऊ वाजेपर्यंत येणे अपेक्षित असताना देखील दहा वाजले तरी त्या हॉस्पिटलमध्ये आल्या नव्हत्या, त्यामुळे अखेर ही बाब डॉक्टर राखी माने यांना समजताच त्या हॉस्पिटलमध्ये आल्या असता त्यांना तेथे संबंधित सोनाराची तज्ञ अधिकारी गैरहजर असल्याचे दिसले. यावेळी माने यांनी हॉस्पिटलमधील प्रशासनाला धारेवर धरले.

महिला रुग्ण