महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांचा पाहणी दौरा ; शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवीन उंची गाठावी – आयुक्त डॉ. ओम्बासे यांचे आवाहन !

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१९ नोव्हेंबर

सोलापूर सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, सुविधा व गुणवत्ता यांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधत शिक्षण क्षेत्राबद्दल विविध मुद्द्यांची माहिती घेतली.

आयुक्तांनी वर्गनिहाय अभ्यासक्रम, उपस्थिती, अध्यापन तंत्र, तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल जाणून घेतले तसेच अभ्यासात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे प्रोत्साहन दिले.

शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आधुनिक पद्धती वापरण्याचे, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी सर्जनशील अध्यापनावर भर देण्याचे तसेच प्रत्येक मुलाकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांनी शाळेतील पायाभूत सुविधा, शिस्त, स्वच्छता, वर्गखोल्यांची स्थिती, उपलब्ध संसाधने यांचेही निरीक्षण केले. शाळेतील वातावरण अधिक प्रेरणादायी राहावे यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.“प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता उजाळविणे हे शिक्षकांचे सर्वात मोठे कार्य आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सृजनशील अध्यापन आणि वैयक्तिक लक्ष या तीन सूत्रांवर शाळांनी काम करावे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, परिश्रम आणि आत्मविश्वास अंगीकारावा. आपली शाळा, आपली मुले आणि आपले भविष्य सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आव्हान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.यावेळी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर प्रशासनाधिकारी मल्हारी माने , पर्यवेक्षक भगवान मुंढे, कॅम्प आवारातील मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन , मोसिना मुजावर , रेहाना नदाफ , माहेजबीन मुल्ला , हारुन बंदूकवाले , नाजनीन कोरबू, योगेश रंगम इ . उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *