डॉ.राखी माने ऑन फिल्ड ॲक्शन मोडवर बेशिस्त कर्मचाऱ्यांचे वेतन कपात तसेच बदलीचे दिले प्रस्ताव….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक २२ जून :- नवनिर्वाचित सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच कामाला लागल्या आहेत. त्यांनी शहरातील विविध आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची पाहणी केली. शहरातील दाराशा नागरी आरोग्य केंद्र, अहिल्या प्रसूतीगृह , शहर दवाखाना, आदींसह विविध आरोग्य केंद्रांची पाहणी करून त्या ठिकाणचा लेखाजोखा घेतला.
बेशिस्त कर्मचाऱ्यांचे वेतन कपात तसेच बदलीचे दिले प्रस्ताव
पाहणी दरम्यान शहर दवाखाना याकाणी रुजू असणाऱ्या अधिकारी अनुपस्थित दिसून आल्या त्यामुळे आरोग्य अधिकारी माने यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आगामी काळात जे अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहतील किंवा कामावर हलगर्जीपणा करतील अशांवर कारवाई करण्याचे संकेत देताना एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदलीचे प्रस्ताव देखील पाठवले आहेत. डॉ राखी माने यांनी तात्काळ पदभार घेतल्यानंतर ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यातील साथीच्या रोगावर घ्यावयाची खबरदारी…
सध्या शहरात पावसाळ्याच्या दिवसात विविध रोगराईला आमंत्रण मिळते तसेच डेंगू चिकुनगुनिया अशा साथीच्या रोगांना देखील सुरुवात होते त्या अनुषंगाने शहरात खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याच पद्धतीने शहरवासीयांनी बाहेरचे कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नये पाणी गरम करून उकळून प्यावे असा सल्ला देखील यावेळी माने यांनी दिला आहे.