मनपा देशमुख वस्ती शाळेत गणेशोत्सवातील स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. २९ सप्टेंबर – चिमुकल्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव , चिमुकल्यांना लाडका बप्पा फार आवडतो. चिमुकले बालगोपाळ आकरा दिवस या उत्सवात अगदी दंग असतात. याच गणेशोत्सवाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, भेटकार्ड स्पर्धा, गणपती गीत गायन स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमधील सर्व स्पर्धक अतिशय उत्साहाने आपले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी तसेच पाठांतराची सवय लागावी यासाठी गितगायन स्पर्धेचे आयोजन केले होते.
दरम्यान विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवर वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष , काँग्रेस यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप मदन चाकोते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी तसेच शालेय शैक्षणिक साहित्य देण्यात आले. चाकोते यांनी आपल्या मनोगतामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. शालेय परिसर व शिक्षक यांचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करा असा त्यांना मोलाचा सल्ला दिला. तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर आभार संतोष सुतार यांनी मानले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.