महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना…..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. ७ सप्टेंबर – सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त अर्थात गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी डॉ. बसवराज तेली,शहाजी उगले, संजीवनी उगले, चिरंजीव आदित्य सह परिवार उपस्थित होते. यावेळी मा आयुक्त व परिवाराच्या शुभहस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यानी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे, असे आवाहन केले.तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना,मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या या वेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या.