आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम — बाळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

सोलापूर, दि.२१ ऑक्टोबर
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार जी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रमां करण्यात आले. या उपक्रमांचा समारोप प्रभाग क्रमांक ५, बाळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम भव्य उत्साहात पार पडला.

या विशेष उपक्रमाअंतर्गत गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी चित्रकला स्पर्धा, १७ ऑक्टोबर रोजी पूरग्रस्तांना कीट वाटप आणि १८ ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमागील उद्दिष्ट सामाजिक जागृती व पर्यावरण रक्षण हे होते, असे संयोजकांनी सांगितले.
वृक्षारोपण कार्यक्रमावेळी प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राजाभाऊ आलू रे, विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, सुहास माने आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजकांनी सांगितले की, “वाढदिवस साजरा करण्याची ही एक आगळीवेगळी पद्धत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण हा एक उपयुक्त आणि सकारात्मक संदेश देणारा उपक्रम आहे. यामधून समाजात हरित सोलापूर घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन अधिकाधिक लोक वृक्षारोपणाकडे वळतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.