शहरातील खेळाडूंसाठी सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असलेलं क्रीडांगण तयार करणार – आ.विजयकुमार देशमुख

शहरातील खेळाडूंसाठी सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असलेलं क्रीडांगण तयार करणार – आ.विजयकुमार देशमुख…

 

राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण उपलब्ध होईल…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ एप्रिल

सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी रूपा भवानी पुणे रोड लगत पर्ल गार्डन जवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून सहा एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्यावत सोई सुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी सभागृह नेता संजय कोळी, प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार,मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव,देविदास चेळेकर,प्रसाद कुलकर्णी, राहुल शाबादे,केदार बिराजदार,
अविनाश बिडवे,सिद्धू गुब्याडकर,राजाभाऊ गायकवाड, यादगिरी कोंडा, विजय कोळी, बिसनूरकर, जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते.

 

पुणे मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सोयी सुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर,राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेच्या सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार देशमुखांनी दिल्या, या जागेवर व्हॉलीबॉल ,खो-खो, कबड्डी,क्रिकेट, स्विमिंग पूल,फुटबॉल, या सह कोचिंग सेंटर उभारण्या संबंधीची चर्चा झाली. यासाठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याचे सूचना आ. देशमुखांनी दिले.शासन दरबारी योग्य तो प्रयत्न करू, या भागातील नागरिकांचे आरोग्याचा विचार करता एक चांगले निसर्गाच्या सानिध्यातील वॉकिंग ट्रॅक यासह अनेक वैयक्तिक आणि सांघिक खेळांचे छोटे-मोठे क्रीडांगण या ठिकाणी होईल अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली.

महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगले मैदान तयार करण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यावेळी सांगितले.
आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसांमध्ये रूपा भवानी मंदिर परिसरात पालिकेच्या जागेवर अद्यावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *