सोलापूर शहरात विधानसभेचे वाहू लागले वारे…. पोस्टरसह सोशल मीडियावर घुमतोय विजय मालकांचा पाचवा विजय…
कितीही ओरडू दया स्वकियांसह विरोधी बेंच…!
विजय मालकांच मतदारांनी केलाय विजयी पंच फिक्स…!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ९ ऑगस्ट – सध्या सोलापूर शहरात आगामी विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग लावून उमेदवारी आम्हालाच मिळेल. या आशेत पोस्टरबाजी बॅनरबाजी सुरू केली आहे. अशातच आता विद्यमान आमदार देखील मागे सरकलेले त्यांनीदेखील सोशल मीडिया काबीज करत आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची मांदियाळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट , राष्ट्रवादी शरद पवार गट , त्यांच्या सोबतीला आता महाराष्ट्र निर्माण सेना , बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच विविध अपक्ष आणि छोटे पक्षांचे उमेदवार देखील आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पडेल असा आशावाद व्यक्त करत आहेत.
शहर उत्तर मधून विजय मिळवण्यास इच्छुक असणाऱ्या विजय मालकांना यंदाची विधानसभा कठीण जाईल असे संकेत मिळत आहेत. त्यांच्या पराभवासाठी गंगा ते राधाश्री पर्यंत बैठकांचा सिलसिला आणि नेत्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त या उक्तीप्रमाणे…. विरोधकांनी विजय मालकांचा विजयी रथ पंच गाठण्यापासून रोखण्यास मोठी मोट बांधली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून पेटलेले मराठा समाज बांधव यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवण्याचा विडा उचलला आहे… परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे. स्वकीयांसह विरोधकांना उत्तर देण्यास शहर उत्तरची फळी तयार झाली आहे.. गेल्या पंधरा वर्षातील कामांचा लेखाजोखा आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून उत्तर ची फळी दमदार उत्तर देण्यास सज्ज झालेले दिसत आहे.
कितीही ओरडू दया स्वकियांसह विरोधी बेंच…!
विजय मालकांचा मतदारांनी केलाय विजयी पंच फिक्स…!
कितीही ओरडू द्या स्वकीयांसह विरोधी बेंच…… विजय मालकांचा आमदारांनी केलाय विजयी पंच पिक्स….असे आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शहर उत्तर मध्ये विजय मालकांना यंदाची निवडणूक खरोखर जड जाईल का? मतदारांनी ठरवल्याप्रमाणे विजय पंच फिक्स होईल? हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे