आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून काँक्रीटीकरण रस्ते विकासकामाचा शुभारंभ…
रस्त्यांसाठी मिळाला ४० लाखांचा निधी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३ ऑगस्ट माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ मध्ये विविध योजनेअंतर्गत ४० लाख रुपयांच्या निधीतून काँक्रीटीकरण रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास २०२३ – २४ योजनेअंतर्गत राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रीय महामार्ग स्वाद हॉटेल कॉर्नर ते निर्मल विहार गेटपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण ३० लक्ष रुपये व सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधा २०२३ २४ योजनेअंतर्गत दहिटणे येथील लक्ष्मी नगर मधील अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता १० लाख रुपये निधीतून होणाऱ्या काँक्रीटीकरण रस्ते विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजयुमो शहराध्यक्ष डॉ. तथा मा. नगरसेवक किरण देशमुख, भाजपा सरचिटणीस तथा मा. नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, मा. नगरसेवक अमर पुदाले, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, विरेश उंबरजे, सतिश महाले, तानाजी गव्हाणे, महादेव जतकर, दयानंद मंठाळकर आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
या विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी संतोष मोकाशे, रवी कोसगी,धरीराज रमणशेट्टी, राहुल शाबादे, चंद्रकांत भक्ते, सुरेश जतकर, नितिन मंठाळकर, काशिनाथ अल्लम, अंजया चित्तारी, व्यंकटेश चेन्नूर, अनिल जंपाल, व्यंकटेश त्रिपाठी, सुनिल कांबळे, श्रीनिवास विभुते, बब्बू दिक्कीत, आदीसह प्रभाग 02 मधील भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेश उंबरजे यांनी तर आभार ज्ञानेश्वर कारभारी यांनी मानले.
शहर उत्तर विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. नागरिकांना दिलेल्या विकासाचा आश्वासनाची पूर्तता करणार आहोत.
– विजयकुमार देशमुख, आमदार
राजराजेश्वरी नगर आणि परिसरातील नागरिकांना पूर्वी रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी येथे आता रस्त्यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आमची या त्रासातून सुटका झाली.
व्यंकटेश चिल्लूर, नागरिक,