आ.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी श्रींची प्राण प्रतिष्ठापना..

आ.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी श्रींची प्राण प्रतिष्ठापना….

सोलापूर शहरवासीयांना बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत, सोलापूर सुजलाम सुफलाम होऊ दे अस घातले श्रींच्या चरणी साकडे…..

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर , दि. ७ सप्टेंबर – आ.विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलिला निवासस्थानी सहकुटुंब सहपरिवार एकत्रित येत, मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाच्या स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ.किरण देशमुख यांच्या हस्ते श्रीचे प्रतिष्ठापना करून आरती  करण्यात आली.

       दरम्यान आ. विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरवासीयांना बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत , सोलापूर सुजलाम सुफलाम होऊ दे अस साकडे श्रींच्या चरणी घातल्याचे सांगीतले. यावेळी लीलावती देशमुख , डॉ.उर्वशी देशमुख, क्रिशा देशमुख , विर्धाथ देशमुख, योगेश स्वामी , सचिन लकडे संतोष जम्मा , सुरेश कुप्पल , योगेश सरशेट्टी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *