सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरात केले भजन कीर्तन ;
नामदेव पायरी येथे वारकऱ्यांसमवेत झाले तल्लीन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दी.९ डिसेंबर
गतसरकारच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असलेले तानाजीराव सावंत पुन्हा एकदा आरोग्यमंत्री व्हावेत यासाठी सोलापुरातील आणि जिल्हाभरातील शिवसैनिकांनी विठुरायाला साकडे घालत दुग्धाभिषेक करून महाआरती केली.
प्रारंभी शिवसेनेच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरात जाऊन नामदेव पायरी येथे वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या तालावर भजन केले. यानंतर श्री विठ्ठलास आणि श्री रुक्मिणीमातेस दुग्धाभिषेक करून, तुळशीहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. तानाजीराव सावंत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना श्री विठुरायाकडे आणि श्री रुक्मिणीमातेकडे करण्यात आली. याप्रसंगी महिलांनी ‘बा विठ्ठला आमच्या भावास पुन्हा एकदा आरोग्य मंत्री कर’ असे आशयाचे फलक हाती धरले होते. यावेळी शेकडो लाडक्या बहिणी, शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी ह.भ.प. वासकर महाराज म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांची तपासणी, औषधोपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाल्याचे ह.भ.प. वासकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुजीत खुर्द, उमेश गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख समर्थ मोटे, सागर शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय बंदपट्टे, संजय सरवदे आदी युवा सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.