Solapur city new leader expections for MLA शहरात खाजगी सर्व्हेक्षणाला आला ऊत ; शहरात भावी आमदाराच्या फलकांची वाढली क्रेझ ; ह्याला बी वाटतय , त्याला बी वाटतय अन् प्रत्येकाला वाटतय आमदार झाल्यासारखे….  

Solapur city new leader expections for MLA शहरात खाजगी सर्व्हेक्षणाला आला ऊत ; ह्याला बी वाटतय , त्याला बी वाटतय अन् प्रत्येकाला वाटतय आमदार झाल्यासारखे….

शहरात भावी आमदाराच्या फलकांची वाढली क्रेझ…

  • सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ३१ जुलै – लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शहरातील शहर उत्तर , शहर मध्य आणि शहर दक्षिण या तिन्ही विधानसेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चाललेली आहे.

        सद्यःस्थितीत शहरात तिन्ही विधानसभेच्या जागेवरून चालू आमदार , एकनिष्ठ कार्यकर्ता तसेच इच्छुक यांची यादी वाढतच चालल्याने त्या त्या पक्षश्रेठींना डोकेदुखी वाढली आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेसकडून घेण्यासाठी माकपने गल्ली ते दिल्लीपर्यंत पायपीट करत आहे. आडम मास्तर यांना खो देण्यासाठी मुस्लिम समाजाने मोट बांधून सदरची मध्य जागा मुस्लिम समाजाला देण्याची मागणी केली आहे.

  तर शहराच्या उत्तरेला देखील मालकांना कोण टक्कर देणार ? यासाठी राष्ट्रवादी अन् काँग्रेसची चाचपणी सुरू झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही जागा मिळविण्याच्या मनसुबा काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांनी आखला आहे. त्यावर कामकाज सुद्धा सुरू असल्याचे बैठकांवरून दिसून येत आहे.

 दरम्यान दक्षिणेचा मुलुख भाजपकडून पुन्हा एकदा आपण जिंकून घेऊ असा आत्मविशवास आता माने अँड कंपनी बाळगून आहे.मात्र त्याला बाबा मिस्त्री आणि सुरेश हसापुरे यांच्या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांची नाराजी माने यांना न परवडणारी आहे. याचा साधक बाधक विचार देखील पक्षाला करावा लागणार आहे.

आमदारकीच्या सर्वेक्षण यादीत अनेकांनी नावे…….

शहरात व्हायरल होत असलेल्या खाजगी सर्वेनुसार अनेकांच्या नावांना पसंती दाखवल्याचे दिसून येत आहे. आपली नावे आमदारकीच्या सर्वेक्षण यादीत येत असल्याने आमदारकीच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. तर काहींनी मोठं मोठे फलक लावून स्वतःला स्वयंम घोषित आमदारच केले आहे. उत्तर मध्ये उत्तर देऊ,  मध्य मध्ये सुवर्णमध्य साधू , तर दक्षिण चा गड परत काबीज करू अशा घोषणा दिल्या जात आहेत. खाजगी सर्वेक्षण नुसार करणाऱ्यांना देखील हा व्यक्ती आमदारकीसाठी पात्र असेल का ? असा प्रश्न पडतो आहे. चालू आमदार ला कंट्यूनिटी, एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या आमदार होण्याची आशा , आणि इच्छुकांच्या वाढत्या इच्छा यांचा ताळमेळ घालून राजकीय गणितांची जुळवाजुळव पक्षश्रेष्ठी आणि पक्षातील बड्या नेत्यांना करावी लागणार आहे. एकंदर खाजगी सर्व्हेक्षणाला ऊत आला असून मला बी वाटतय , ह्याला बी वाटतय , त्याला बी वाटतय , प्रत्येकाला वाटतय आमदार झाल्यासारखे….अर्थात देश संविधानानुसार चालतो. आणि संविधानानुसार प्रत्येकाला आमदार होण्याचे स्वप्न पडू शकते फक्त ते दिवा असू नये एवढे खरे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *