सत्ताधारी भाजप काँग्रेस युतीच्या विरोधात आ.सुभाष देशमुखांनी फुंकले रणशिंग…
सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलचे १५ उमेदवार जाहीर… आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी घेतली भेट

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ एप्रिल
राज्यातील मोठ्या आर्थिक उलाढालेसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी सरळ सरळ लढत होणार आहे. एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार तर दुसरीकडे माजी सहकार मंत्री तथा आमदार यांचे पॅनल जाहीर झाले आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. त्यांना साथ देण्यासाठी भाजपचे दुसरे आमदार तथा माजी सभापती विजयकुमार देशमुख यांनी देखील त्यांना साथ देण्याचे जाहीर केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची व स्वाभिमानाची होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार देखील उपस्थित होते. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. यावेळी दोन्ही देशमुख यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. यापुढील निवडणुकीची रणनीती कशी असेल, हे देखील या बैठकीत बोलल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बाजार समितीची निवडणूक कार्यकर्त्याची आहे, त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. या भूमिकेतून भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आपण पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्या या पॅनलमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याचा समावेश झाल्याने चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. श्रीसिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्रीसिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल झाल्याने आता ही निवडणूक रंगणार आहे. दोन्ही पॅनलचे नाव जरी सिद्धेश्वर असले तरी ही निवडणूक सुभाष देशमुख विरोधात सर्वपक्षीय आघाडी असेच होणार असल्याचे चित्र आहे. परिवर्तन पॅनल मध्ये युवा नेते मनीष देशमुख हा युवा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीवळी सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी संचालक आप्पासाहेब पाटील हे सुद्धा आता सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. सुभाष देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी चहासाठी जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही देशमुख नेत्यांच्या भेटीकडे आता सर्वांच्या नजरा लागले आहेत.
श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे खालील प्रमाणे उमेदवार
श्री सिध्देश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल
ग्रामपंचायत – सर्वसाधारण
देशमुख मनिष सुभाष ( सोलापूर )
चिवडशेटटी रामप्पा चंद्रशेखर (होटगी)
ग्रामपंचायत- अनुसूचित जाती/जमाती
गायकवाड अतुल हरी ( होटगी )
ग्रामपंचायत – आर्थिक दुर्बल घटक
शहा यतीन विजयकुमार ( भंडारकवठे )
सहकारी संस्था – सर्वसाधारण
हविनाळे चन्नगोंडा गुरुसिध्दप्पा ( बरुर )
आसबे रमेश नामदेव ( अकोले मंद्रुप )
बबलेश्वर भिमाशंकर कलप्पा ( भंडारकवठे )
पाटील आप्पासाहेब मल्लीनाथ ( वडकबाळ )
पाटील बाळासाहेब दादाराव ( विंचूर )
पाटील संग्राम प्रतापराव ( कौठाळी )
अचलारे धनेश सुभाष ( बोरामणी )
सहकारी संस्था – महिला राखीव
पुजारी निलाबाई गुरप्पा ( वडकबाळ )
गुरव पुष्पा मल्लिकार्जुन ( हणमगाव )
सहकारी संस्था – इतर मागासवर्ग
तेली सुभाष गुरण्णा ( होनमुर्गी )
सहकारी संस्था – विमुक्त जाती, भटक्या जमाती
टेळे संदीप अमृत ( औराद )