आ.सुभाष देशमुखांकडून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन ; महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत व्यक्त केली इच्छा !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६ नोव्हेंबर –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवत भाजपाने १३३ जागा जिंकल्या. या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ.सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबईत भेटून अभिनंदन केले. तब्बल ७७ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत आ.देशमुख जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक विजय संपादन केल्याबद्दल आ.देशमुख यांचा यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला. यावेळी विजयात किंगमेकर ठरलेले मनिष देशमुख व रोहन देशमुखही उपस्थित होते.
दरम्यान,फडणवीस हे कुशल आणि अनुभवी आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.