रोप फाऊंडेशनचा भरभरून कार्यक्रम….!
महाराष्ट्राचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
रोप सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. १९ सप्टेंबर – रोप फाऊंडेशन सोलापूर यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोप सांस्कृतिक महोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनीसाठी सांस्कृतिक तसेच विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच महिलांकरीता भव्य भजन स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आलेले आहे. तरी रोप सांस्कृतिक महोत्सव २०२४ मध्ये सोलापूर मधील विद्यार्थी विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली आहे.
दरम्यान या महोत्सवात स्केटींग स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २२/०९/२०२४ रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत गोविंदश्री चौक, जुळे सोलापूर येथे करण्यात आले. मोफत बालक्रिडा प्रशिक्षणाचे आयोजन दि. २३/०९/२०२४ ते दि. १०/१०/२०२४ रोजीपर्यंत करण्यात आले. निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार दि. २४/०९/२०२४ रोजी करण्यात आले. महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरूवार दि. २५/०९/२०२४ रोजी करण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे आयोजन शालेय / महाविद्यालयामध्ये गुरूवार दि. २६/०९/२०२४ रोजी करण्यात आले. अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. २७/०९/२०२४ रोजी सायं ४.०० वाजता शासकीय मैदान, विजापूर रोड, सोलापूर येथे करण्यात आले.
भजन स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २८/०९/२०२४ रोजी द्वारकाधीश मंदीर, जुळे सोलापूर येथे करण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा व फॅशन शो स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन रविवार दि. २९/०९/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजलेपासून मांगल्य मंगल कार्यालय, भारतीय विद्यापीठ शेजारी, विजापूर रोड, सोलापूर येथे करण्यात आले. व याच वेळी रोप सांस्कृतिक महोत्सव २०२४ या कार्यक्रम व स्पर्धेतील सहभागी व विजेते यांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
सदरचा महोत्सव व स्पर्धा चांगल्या रितीने संपन्न करण्यासाठी आयोजन समितीचे मुसा अत्तार, प्रा.अश्विनकुमार नागणे, मिलींद मोरे, संपन्न दिवाकर, अजित पात्रे, मोहित निकम, ऋषिकेश शिंदे, सचिन खंडागळे, आकाश मस्के, वैभव कुलकर्णी, आनंद साखरे, युन्नुस अत्तार, इरफान शेख, रियाज गाडीवान, युसूफ अत्तार, रामण्णा बन्नी यांनी परिक्षम घेतले आहे. या रोप महोत्सव २०२४ नियोजित स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम दि. २१/०९/२०२४ ही असून यामध्ये सहभागी होण्यासाठी युसूफ पिरजादे (मो. ९८९०८६९८१४), जया वाघमारे (मो.नं. ९५६१०३७५६८), मुसा अत्तार (मो. ८८३०३०७०२५) अश्विनकुमार नागणे (मो.नं. ९६०४६५६६६७) यांना संपर्क करावा असे आवाहन प्रशांत बाबर यांनी केले आहे.
या पत्रकर परिषदेस अश्विनकुमार नागणे, मुसा अत्तार, अजित पात्रे, संपन्न दिवाकर, मिलिंद गोरे, अनिल साखरे, युसूफ पिरजादे, युनूस अत्तार, रियाज अत्तार, झहीर शेख, आदी उपस्थित होते.