आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून साकार सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा…पद्मशाली समाजातील गरजूंची सामुदायिक विवाह सोहळ्यात होणार शुभमंगल आपली उपस्थिती प्रार्थनीय…
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ नोव्हेंबर
स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 05 वाजून 42 मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक, आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी केले आहे.
स्थळ – स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर जवळ, सोलापूर.
अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान 15 मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती

आपणही समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेतून देवेंद्र कोठे यांचा नवोपक्रम
आपणही समाजाला काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आ. देवेंद्र कोठे यांनी सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे महत्त्वाचे कार्य गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले आहे. स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ज्या परिवाराला लग्न करण्याचा अनेक अडचणी येतात. अशा परिवारांना या सामुदायिक विवाह सोहळ्यातून एक आनंदाची पर्वणी मिळणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाच्यावर्षी देखील हा विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. कर्णिक नगर येथील वल्याळ मैदानावर हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.

दरम्यान, संस्थेकडून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात संस्थेकडून वधूस – लग्नाचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास – विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल. त्याचबरोबर हार-बाशिंग-तुरे, संसारोपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट अशा विविध वस्तू व सुविधा दिल्या जाणार आहेत..वधू-वर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी १०० पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य वरात देखील संस्थेकडून मोठ्या उत्साही वातावरणात काढली जाणार आहे.