इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आ.देवेंद्र कोठे आणि मोनिका वहिनी यांचा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२२ डिसेंबर
इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका वहिनी यांचा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
दरम्यान, इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव,कार्तिक किसन जाधव, गजू विक्रांत शिंदे,महादेव राठोड, माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, माऊली जरग, दयानंद जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट रोडवरील कै. लिंगराज वल्याळ क्रीडांगण येथे स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांना दादासाहेब असे नमूद असणारे फेटा,भला मोठा हार घालून, केक कापून, देवेंद्र दादा आणि मोनिका वहिनी साहेबांचा प्रतिमा भेट देऊन यावेळी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,आमदार देवेंद्र कोठे यांचे मोठे बंधू डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण नारायण माशाळकर, सचिन आंगडीकर समस्त कोठे परिवार यांच्यासह सोलापूर शहरातील सर्व राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका वहिनी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या.