अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासत लावला शोध

आरोपीला घेतले ताब्यात फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी
सोलापूर व्हिजन न्युज,
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संशयित आरोपीला फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून कराड येथून उचलले. अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने तांत्रिक पोलिसांनी तांत्रीक पध्दतीने आणि खात्रीशीर माहितीद्वारे शोध सुरु केला.
पोलीसांनी तांत्रीक पद्धतीने शोध घेत तसेच मुलीच्या मैत्रीणी यांचेकडे चौकशी करुन, त्याआधारे तपास करीत असताना पोलीसांना तपासाच्या टप्प्यावर खात्रीशीर माहिती मिळाली की, सिद्राम बुक्का (रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापुर) याने पळवून नेले आहे. तात्काळ सदर व्यक्तीचा शोध घेतला असता तो कारवे नगर, ता. कराड जि. सातारा येथे अपहरण केलेल्या मुलीला घेऊन आल्याचे कळाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी पोलीस उपनिरीक्षक बावणे व डीबी पथकामधील अंमलदार यांना कराड येथे रवाना केले. कराड येथे पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर लोकेशन ट्रेसिंगद्वारे संशयित आरोपी सिद्राम नागप्पा बुक्का (वय १९) रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापुर हा कारवे नगर, ता. कराड, जि. सातारा येथे सापळा रचून पकडण्यात आले.
संशयताला ताब्यात घेत त्याच्याकडून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासाच्या आत अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे. या घटनेतील संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सतीश बावणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे, पोलीस नाईक अयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल,सुरज सोनवलकर, अमोल पवार यांनी केलेली आहे.
