एमआयएमचे जोरदार शक्ती प्रदर्शन ; भाजपला देणार जोरदार टक्कर – फारूक शाब्दि
भव्य दिव्य रॅली काढून भरला उमेदवारी अर्ज….!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २८ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीमध्ये आता अधिक रंगत येत चालली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापूर्वी प्रमुख पक्ष भाजप, उद्धव ठाकरे गट, आणि एम.आय.एम पक्षाने आपापल्या मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज दाखल केले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एम.आय.एमकडून अधिकृत उमेदवार फारूक शाब्दि यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
पारंपारिक ढोल पथक झाले सहभागी.
फारूक शाब्दि यांच्या नामनिर्देशन अर्ज भरतेवेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कर्नाटक येथील ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. पारंपारिक वाद्य रुंद आणि त्यासोबत मर्दानी खेळ कसरती सादर करून कलाकारांनी उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले.

दरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या भव्य अशा रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युवकांचा प्रचंड उत्साह या रॅली मध्ये पाहायला मिळाला. या रॅलीत एमआयएमच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हातामध्ये हिरवे, भगवे, निळे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत निघालेल्या यारॅलीतून उमेदवार फारूक शाब्दि यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जिंदा शहा मदार चौक या ठिकाणाहून ही रॅली विजापूर वेस, बारा इमाम चौक मार्गे पुढे सिव्हील चौक या ठिकाणी आली. तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शाब्दि हे इम्तियाज जलील यांच्यासोबत निवडणूक निर्णय कार्यालयाकडे रवाना झाले.
यावेळी उमेदवार फारूक शाब्दी म्हणाले, माझी खरी लढत भाजप सोबत आहे, लोकसभा निवडणुकीत संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, भाजपला थांबवले. आज आलेली ही गर्दी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आलीय. आणि निश्चितच यावेळी एम आय एम बाजी मारेल.
जलील म्हणाले, हा जनसमुदाय आहे तो विजयाची नांदी आहे,सर्वसमाजाच्या मतांवर फारूक शाब्दी हे यावेळी निश्चित विजयी होतील असा विश्वास केला.लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले, मत विभाजन टाळले, तशाच प्रकारे विधानसभेत होईल अशी अपेक्षा होती, पण समाजाची नाराजी झाली. याप्रसंगी एमआयएमचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.